Amazon

Sunday, 19 May 2013

रक्ता रक्तात भिनलाय काय...जय जिजाऊ जय शिवराय...!!!

मोगलांचे लष्करी बळ आणि त्यांची प्रचंड साधनसामग्री पाहता महाराजांची साधने अल्पच म्हणावी लागतील. म्हणून महाराजांनी मोगलांशी लढताना जी युध्दनीती अमलात आणला तीत लष्करी हालचालीबरोबरच राजकीय , सामाजिक आणि आर्थिक साधनेही पूर्ण प्रमाणात वापरली,

रक्ता रक्तात भिनलाय काय...जय जिजाऊ जय शिवराय...!!!




आपल्या छत्रपती शिवाजी राजेच्या इतर राज्य नि केलेली स्तुतिसुमने....

"▶मि. अनाल्ड टायबर्न (जगविख्यात इतिहासकार) - "छत्रपती शिवाजी महाराज्यांसारखे राजे जर आमच्या देशात होऊन गेले असते तर, त्यांच्या स्मृतींचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन नाचलो असतो."


▶इब्राहीम-लि-फ्रेडर (डच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाप्रसंगी सोन्याच्या सिंहासनावर बसताच सर्व मराठ्यांनी अत्यंत प्रेमाने "छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी गर्जना केली."


▶डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार) - "स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत.



▶मार्शल बुल्गानिन (मा. पंतप्रधान - रशिया) - "साम्राज्यशाही विरुद्ध बंद उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजीमहाराज्यांनी रोवली."


▶मि. मार्टिन मांडमोगरी (फ्रेंच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी राजे त्यांच्या गुप्तहेरांना भरपूर पगार आणि बक्षिसे देत असत. त्यांची तलवार यशासाठी आदीव तत्पर असे."

▶प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे."

▶ब्यारन कादा (जपान) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानवजातीचे हित केले."

▶एन्टोनियो (पोर्तुगीज व्हायसराय) - "छत्रपती शिवरायांच्या नौदलातमुळे सागरी किल्ल्यात वाढ झाली. राज्यांच्या नाविक दलाची शत्रूला भीती वाटते."




आज्ञापत्रात म्हंटले आहे.

" कोण्हावरी चालोन जाऊन तुंबळ युध्द करून रणास आणिले , कोण्हावरी छापे घातले , कोण्हास परस्परे कलह लाऊन दिल्हे , कोण्हाचे मित्रभेद केले , कोण्हाचे डेरियांत सिरोन मारामारी केली , कोण्हासी येकांगी करून पराभविले , कोण्हासी स्नेह केले, कोण्हाचे दर्शनास आपण होऊन गेले, कोण्हास आपले दर्शनास आणिले , कोण्हास परस्पर दगे करविले ..... यैसे ज्या ज्या उपाये जो जो शत्रु आकळावा तो तो शत्रु त्या त्या उपाये पादाक्रांत करून , साल्हेरी अहिवंतापासुन चंदी कावेरी तीरपर्यंत निष्कंटक राज्य , शतावधि कोटकिल्ले , तैसीच जलदुर्गे व कित्येक विषम स्थळे हस्तगत केली . "

महाराजांच्या युध्दनीतीचे मोठे समर्पक वर्णन वरील उतार्यातून आले आहे . मोगलांची प्रचंड साधने आणि महाराजांचे मर्यादित मनुष्य आणि संपत्तिबळ या पाश्र्वभूमीवर महाराजांची युध्दनीती ही उठून दिसते . महाराज हे कुशल आणि कसलेले सेनापती तर होतेच पण त्याबरोबरच ते युध्दाच्या राजकीय , सामाजिक आणि आर्थिक अंगाचे उत्क्रष्ट (चांगले) तज्ञ होते . उघड हल्ला केव्हा करावा , माघार केव्हा घ्यावी , शत्रुसैन्याच्या हालचाली केव्हा आणि कशा थांबवाव्या , शत्रुला तहाच्या गोष्टीत कसे गुंतवून ठेवावे , शत्रुपक्षातील माणसांची सहानुभूती कशी मिळवावी , शत्रुच्या अधिकारयांत आपसांत कलह कसे लावावे हे महाराजांनी उपयोगात आणलेले उपाय पाहता मन विस्मित होते .


शोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३२ मन
सोन्याच्या सिँहासनाचा आणि भवानी तलवारी

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी ३२ मन सोन्याचे सिन्हासन बनवले होते

१ मन म्हणजे ४०
किलो ,आणि ३२*४०=१२८० किलो

१२८० किलो चे सोन्याचे सिँहासण होते.ते
सिँन्हासण मराठ्याणचा विजयाचे आणि स्वराज्याचे प्रतिक होते.शिवशकाचे साक्षीदार होते.

शिवरायांची तलवार
छत्रपती शिवरायांणा जिजामातांणी स्वतः पोर्तोगीजांकडुण पोर्तोगीज बनावटीची तलवार विकत घेउण दिली होती,जीच्यात शिवरायांनी तोडे बद्दल
केले,तलवारीच्या मुठीला गादीचे अस्तर
लावले,म्हणजे घाम आल्यावर तलवार हातातुण
निष्टु नये.(शिवरायांनी सर्व
मावळ्यांचा हाती आधुनिक फिरंग उर्फ भवानी तलवार दिली होती)तलवार
वजनाला हालकी आणि लांबीने मोठी व
दुधारी होती,
त्यामुळे तलवार फिरवायला,पेलायला अडचण येत नसे.
१८१८ साली पेशव्यांना हारवुन ईँग्रजांनी रायगडावर ताबा मिळवला,त्यानंतर
पेशव्यांचा मदतीने ईँग्रजांनी मराठेशाहीतील
बहुमुल्य गोष्टी जसे कि छत्रपतीँचे सिँन्हासण, वाघनखे,महत्वाचे कागदपत्रे आणि शिवरायांची तलवार ईँग्लंडला घेऊण गेले.

मराठेशाही प्रमाणे ईँग्रजांनी टिपु सुलताण आणि सिखांच्या देखील तलवारी आणि काही बहुमुल्य गोष्टी ब्रिटणला निल्या होत्या पण त्या त्यांचा वारसदारांनी परत आणल्या.

आपल्या मराठा समाजातील अतिपवित्र असलेले छत्रपतीँचे सिँन्हासण आणि तलवार आपण मराठ्याणी ब्रिटण हुण परत आणायला पाहीजे,त्यासाठी आपल्याला बुध्दीने संघर्ष करावा लागणार आहे,कायद्याचा मार्गाने त्यागोष्टी आपल्याला परत आनाव्या लागतील,त्यासाठी आपल्या मराठा समाज जागृत झाला पाहीजे आणि त्यामुळेच आपल्याला मराठा आरक्षण गरजेचे आहे.

आरक्षणामुळे मराठा शिक्षीत होईल,आणि मग ब्रिटणला आपल्यासमोर गुडगे टेकावेच लागतील.

आपल्याच देशामध्ये अंतर्गत प्रांतवाद,जातीयवाद आणि धार्मिक लढाई लढण्यापेक्षा आपण मराठा आरक्षण घेऊण ब्रिटणच्या सिन्हासणाल झुकवुया

जय जिजाऊ
जय शिवछत्रपती
जय शंभूछत्रपती

:- अजिँक्य गुळवे-पाटील

No comments: